Eknath Shinde On Sanjay Raut : 'बाळासाहेबांच्या विचारांवर निष्ठा असती तर...', राऊतांवर शिंदेंची टीका

राऊतांच्या पुस्तकावर शिंदेंची टीका: बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले असते
Published by :
Prachi Nate

काल संजय राऊत यांनी त्यांच्या 'नरकातला स्वर्ग' (Narkatla Swarg) या पुस्तकाच्या माध्यमातून पुस्तकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि शदर पवार यांच्याविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राऊतांच्या पुस्तकावर टीका केली आहे. बाळासाहेबांच्या विचारांवर निष्ठा असती तर, अशी पुस्तकं काढायची वेळ आली नसती, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. तर, राऊतांनी शरद कुलकर्णींच्या पुस्तकाचे बोध घ्यावे, असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे म्हणाले की, "शरद कुलकर्णी कोण आहे जगाला माहिती झाले पाहिजे, एखादे काम हाती घेतले तर करेक्ट कार्यक्रम करतो. एक पुस्तक आहे 'नरकातलं स्वर्ग' पुस्तक त्यांनी शरद कुलकर्णी यांच्या पुस्तकाचे बोध आणि मार्गदर्शन घेतले पाहिजे. बाळासाहेबांचे विचारांवर निष्ठा ठेवली असती तर असे पुस्तक काढले नसते. बाळासाहेबांचे राम मंदिराचे स्वप्न पूर्ण केले असते. अशी पुस्तकं काढायची वेळ आली नसती. तुम्ही टीका करत आहे त्याचे पाप झाकता येत नाही. माझा आवाज कोणीची दाबू शकत नाही हा जनतेचा आवाज आहे. राऊतांनी शरद कुलकर्णींच्या पुस्तकाचे बोध घ्यावे"

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com