Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत उपमुख्यमंत्र्यांनी दिली मोठी अपडेट म्हणाले की...
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली Scoll करा...
राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेला दिलासादायक संदेश चर्चेत आला आहे. “लाडकी बहीण योजना कोणीही बंद करू शकत नाही,” असं ठाम वक्तव्य त्यांनी केलं आहे.
अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी राबवण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 इतकी थेट आर्थिक मदत मिळते. अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील, 65 वर्षांखालील आणि ज्यांच्या नावावर चारचाकी वाहन नाही अशा महिलांनाच या योजनेचा लाभ मिळतो. तसेच एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांना या मदतीचा लाभ घेता येतो.
अनेक महिलांनी चुकीच्या माहितीद्वारे लाभ घेतल्याचं समोर आल्यानंतर सरकारने KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे. यामुळे पात्रतेच्या बाहेरच्या लाभार्थींची नावं वगळण्याचं काम सुरू आहे.
दरम्यान, या प्रक्रियेमुळे “योजना बंद पडणार का?” असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला होता. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं की, “लाडक्या बहिणींच्या योजनेला कुणाचंही वाईट डोळं लागू देणार नाही. ही योजना सुरूच राहील आणि महिलांच्या हक्कांसाठी आम्ही ठाम आहोत.” महिलांसाठी ही योजना केवळ आर्थिक मदत नाही, तर सन्मान आणि आत्मनिर्भरतेचं प्रतीक बनली आहे.
Summery
राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलासादायक बातमी दिली...
“लाडकी बहीण योजना कोणीही बंद करू शकत नाही,” असं ठाम वक्तव्य त्यांनी केलं आहे.
अनेक महिलांनी चुकीच्या माहितीद्वारे लाभ घेतल्याचं समोर आल्यानंतर सरकारने KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे.

