ताज्या बातम्या
Ajit Pawar : 'माझ्या बाळाच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी', वीरपत्नीची अजित पवारांकडे मागणी
अजित पवारांकडे वीरपत्नीची मागणी: शहीद जवानाच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी येथे पक्षप्रवेश सोहळ्यानंतर अजित पवारांनी देगलूर येथे शहीद जवान सचिन वनजे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. सचिन वनजे हे जम्मू काश्मीर मध्ये दरीत लष्कराच वाहन कोसळून शहीद झाले. शहीद जवान सचिन वनजे यांच्या पत्नी आणि आई-वडिल यांची भेट घेऊन सांत्वन केले. राज्य शासनाकडून सर्वोत्तपरी मदत देण्याचे आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.