ताज्या बातम्या
Wardha : इंदिरा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, देवळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
काल मध्यरात्री कुण्या विक्षिप्त इसमाने देवळी बस स्टॉप जवळील भारतरत्न स्व. इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याच्या चेहऱ्यावर रुमाल बांधून विटंबना केली.
काल मध्यरात्री कुण्या विक्षिप्त इसमाने देवळी बस स्टॉप जवळील भारतरत्न स्व. इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याच्या चेहऱ्यावर रुमाल बांधून विटंबना केली. आज सकाळी युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष श्री किरण ठाकरे यांच्या हि बाब लक्षात येताच त्यांनी हा पुतळा पाण्याने स्वच्छ धुऊन हार अर्पण केले.
या प्रकारणी देवळी पोलिसात तक्रार देण्यात आली पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाही करावी अशी मागणी किरण ठाकरे यांनी केली. यावेळी काँग्रेस चे पदाधिकारी देखील उपस्थित होते.