Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Team Lokshahi

आमचं सरकार आल्यानंतर आम्ही 25 हजार कोटींचे प्रकल्प मंजूर केले - देवेंद्र फडणवीस

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार असतानाच टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेला, त्यावेळी महाराष्ट्राचे वातावरण गुंतवणुकीसाठी चांगलं नसल्याचे गुंतवणूकदार म्हणायचे
Published by :
Sagar Pradhan

राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध प्रकल्पावरून जोरदार आरोप- प्रत्यारोप सुरु आहे. विरोधकांच्या याच आरोपांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार उत्तर दिले आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार असतानाच टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेला, त्यावेळी महाराष्ट्राचे वातावरण गुंतवणुकीसाठी चांगलं नसल्याचे गुंतवणूकदार म्हणायचे असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Devendra Fadnavis
पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी भागात भूकंपाचे धक्का

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

आमच सरकार येऊन तीनच महिने झाले आहे, तरी चुकीची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय. राज्यातील उद्योग बाहेर जात असल्याचे खोटं बोललं जात आहे. "काही लोकांनी बदनामीचा घाट घातला असून अडीच वर्षाच्या काळात केवळ भ्रष्टाचार आणि इतर कांड झालेत. त्यामुळे कुणीही महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यात तयार नव्हते. महाराष्ट्राची विसकटलेली घडी आम्ही जागेवर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही गेल्या कॅबिनेटमध्ये 25 हजार कोटींचे प्रकल्प मंजूर केले आहेत." असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

गुंतवणुकीचा बाप म्हणजे रिफायनरी, सर्वात मोठी म्हणजे तीन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेली गुंतवणूक, ही अद्याप होऊ शकलेली नाही. याला जबाबदार या आधीचे सरकार आहे. आता मला त्यांना सवाल आहे की त्यांना गुंतवणुकीबद्दल प्रश्न विचारण्याचा काय अधिकार आहे? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Devendra Fadnavis
शिंदे गटाच्या आमदारांनी खासदारांनी ५० खोके घेतलेत, राणांनी माघार घेतल्यानंतर पटोलेंचा निशाणा

विरोधक फेक नरेटिव्ह तयार करतायत

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "फॉक्सकॉन आमच्या काळात महाराष्ट्राबाहेर गेला नाही. उद्धव ठाकरेंच्या काळात त्या वेळचे उद्योगमंत्री सुभाष देसांईनी सांगितलं होतं की फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार नाही. टाटा एअरबसच्या बाबतीत हीच गोष्ट लागू आहे. असा आरोप त्यांनी महाविकास आघाडीवर केला आहे.

महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स हब होणार

इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर केले असून भविष्यात महाराष्ट्र हे इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे. महाराष्ट्राला केंद्राने दिलेली ही भेट आहे त्यामुळे मी केंद्र सरकारचे आभार मानतो. असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या पत्रकार परिषदेत केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com