Devendra Fadnavis : सागरी व्यापार क्षेत्रात 15 करार केले; फडणवीसांची माहिती

महाराष्ट्राने ५६ हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांवर (MoUs) सह्या केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली
Published by :
Varsha Bhasmare

इंडिया मेरीटाईम वीक (India Maritime Week) मध्ये महाराष्ट्राने ५६ हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांवर (MoUs) सह्या केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. 'ठाकरेंच्या पक्षाने कुबड्या घेऊनच सत्तेमधे आलाय,' असा थेट हल्लाबोल फडणवीसांनी केला आहे. जगातील पहिल्या दहा बंदरांमध्ये वाढवण बंदर (Vadhavan Port) हे गणले जाईल, ज्यामुळे एक 'मेरीटाईम पावर' (Maritime Power) भारत बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासोबतच, निवडणूक आयोगावरील (Election Commission) आरोप म्हणजे विरोधकांचे पराभवाच्या भीतीतून केलेले 'कव्हर फायरिंग' असल्याची टीकाही त्यांनी केली. डॉक्टर भगिनीच्या मृत्यूच्या प्रकरणाचे राजकारण करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली असून, दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. जैन समाज आणि बिल्डर यांच्यातील वादात समाजाच्या भावनांचा आदर केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com