Devendra fadnavis : महायुतीच्या विजयानंतर भाजपमध्ये हालचाली सुरु, मुख्यमंत्र्यांनी फिरवला 'या' नेत्याला फोन म्हणाले...
Devendra Fadnavis Calls Amit Satam : राज्यातील 29 महापालिका निवडणुका जवळजवळ ठरल्या आहेत. बहुसंख्य महापालिकांमध्ये भाजपने जोरदार विजय मिळवला आहे. मुंबईत भाजप-एकनाथ शिंदे महायुतीने पत्ता ठोकला असून, उद्धव ठाकरे यांच्या दीर्घ सत्तेला धक्का बसला आहे. यंदा भाजपाने सभा, रॅली, कॉर्नर मिटिंगसह पूर्ण ताकद लावून रणनीती आखली होती, त्याचा परिणाम आता स्पष्ट दिसतोय.
मुंबईत महायुती विजयी ठरल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांना फोन करून शुभेच्छा दिल्या. या कॉलमध्ये फडणवीस म्हणाले, “अमित, खूप छान काम केलंय. आता काहीही चिंता नाही, आपण जोरदार पुढे जाऊया. अभिनंदन!”
मुंबई महापालिकेत एकूण 227 जागा आहेत. आतापर्यंत 95 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर 30 जागा एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवारांकडे आहेत. ठाकरे बंधू 75 जागांवर पुढे आहेत, यामध्ये मनसेला 9, शिवसेनेला 66 जागा मिळू शकतात. काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीला 15 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता असून, इतर व अपक्ष उमेदवार 11 जागांवर विजयी ठरू शकतात. मुंबईत आता स्पष्ट बहुमत महायुतीकडे जात असल्याने महापौरपदाचा मार्ग सुलभ दिसतोय.

