'तोंडाच्या वाफा काढण्याशिवाय यांना काही जमत नाही' फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

'तोंडाच्या वाफा काढण्याशिवाय यांना काही जमत नाही' फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिरात बजरंगबली जयंती निमित्त टेकडी रोडवरील हनुमान मंदिराचे दर्शन घेतले.
Published by :
shweta walge

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिरात बजरंगबली जयंती निमित्त टेकडी रोडवरील हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी बजरंग बली बुद्धी आणि शक्ती देतात. त्यांना बुद्धी मागितली आहे, देशावर जे काही संकट येतात ते दूर करण्यासाठी आणि आमच्यासाठी बुद्धी आणि आमच्या विरोधकांसाठी सुबुद्धी मागितलेली आहे. तसचं त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका देखील केली आहे.

उद्धव ठाकरेंवर टीका करत म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून एक केलेला काम दाखवावं. मुंबई पंचवीस वर्षे महानगरपालिका होती त्यांनी केलेलं एक काम दाखवावं. तोंडाच्या वाफा काढण्याशिवाय यांना काही जमत नाही. यांचे भाषण ठरलेले आहे. उद्धव ठाकरेंचं भाषण जसेच्या तसे मी म्हणून दाखवू शकतो असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लावला.

शरद पवारांवर टीका करत म्हणाले की, हे सगळे निराश झालेले आहे. पराभवाच्या भीतीने हे शिव्या द्यायला लागलेले आहे. जेव्हा जेव्हा मोदीजींना शिवा पडतात लोक त्यांचा जय जयकार होतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com