Devendra Fadnavis latest News
Devendra Fadnavis Lokshahi

आपला गुरु कोण आहे? भाजपच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"मी तुम्हाला दाव्याने सांगतो, या विधासभेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात महायुतीतच सरकार निवडून येईल. ही छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यभूमी आहे"
Published by :
Naresh Shende
Published on

Devendra Fadnavis Speech : अनेक लोक आपल्या गुरुचं दर्शन घेण्यासाठी जातात. महाराष्ट्रात कुणी शेगाव, अक्कोलकोट, तर कुणी शिर्डीला जातं. वेगवेगळ्या ठिकाणी गुरू माऊलीचं दर्शन घेण्यासाठी लोक जातात. या सर्व गुरु माऊलींना मी वंदन करतो. पण आज आपल्याला गुरु सारखा असलेला आपला पक्ष भरतीय जनता पक्षाच्या अधिवेशनात आपण आलो आहोत. आपला गुरु कोण आहे? भगवा ध्वज आपला गुरु आहे. या पवित्र भगव्या ध्वजाला मी वंदन करतो. कारण हा भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. हा भगवा ध्वज प्रभू श्रीरामांचा आहे. हा भगवा ध्वज प्रभू श्रीकृष्णांचा आहे. हा भगवा ध्वज भारत मातेचा अखंड भारतमातेचा ध्वज आहे. म्हणून या गुरुला मी खऱ्या अर्थाने नमन करतो, असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथील भाजपच्या अधिवेशनात केलं.

फडणवीस कार्यकर्त्यांना संबोधीत करताना म्हणाले,आता चातुर्मास सुरु होत आहे. आपल्याला संपर्क आणि संवादाचा मार्स सुरु करायचा आहे. या अधिवेशनाचं स्थान ऐतिहासिक आहे. आजची तारीख लिहून ठेवा. मी तुम्हाला दाव्याने सांगतो, या विधासभेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात महायुतीतच सरकार निवडून येईल. ही छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यभूमी आहे. हे शिक्षणाचं माहेरघर आहे. हे तंत्रज्ञानाचं माहेरघर आहे. हे समाजसुधारकांचं माहेरघर आहे. अशा या पुण्यातून जो विचार निघतो, तो गावागावात पोहोचतो. भाजपचा विचार पुन्हा गावागावात पोहचवण्यासाठी आपण सर्व लोक याठिकाणी आलो आहोत.

आपण २०१४, २०१९ आणि २०२४ ची निवडणूक लढलो. २०१४ च्या निवडणुकीत लोकांचा निर्धार आपण बघितला. २०१९ च्या निवडणुकीत लोकांचा पाठिंबा बघितला. २०२४ च्या निवडणुकीतही जनता आपल्या पाठिशी होती. निवडणुकीत आम्ही जिंकतो किंवा शिकतो. फेक नरेटिव्ह कसा तयार होतो, तो कोण तयार करतो, याची माहिती आम्हाला आहे. आता फेक नरेटिव्हला खऱ्या नरेटिव्हने उत्तर देण्याची ताकद आपण निर्माण करणार आहोत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com