Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

भाजपकडून राष्ट्रवादीला कॅबिनेट मंत्रिपद नाहीच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "एका पक्षासाठी तो निकष..."

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला कॅबिनेट मंत्रिपद मिळणार नसल्याचं माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.
Published by :

Devendra Fadnavis On NCP : केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकही मंत्रिपद मिळणार नाही. केंद्रीय मंत्रिपदावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वाद सुरु आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात रस्सीखेच सुरु असल्याची माहिती समोर आली होती. परंतु, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीला कॅबिनेट मंत्रिपद मिळणार नसल्याचं माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सरकारच्या वतीनं एक जागा ठरवण्यात आली होती. राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अशाप्रकारे ही जागा त्यांना देण्यात आली होती, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सरकारच्या वतीनं एक जागा ठरवण्यात आली होती. राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अशाप्रकारे ही जागा त्यांना देण्यात आली होती. परंतु, त्यांचा आग्रहा असा होता की, आमच्याकडून प्रफुल्ल पटेल यांचं नाव निश्चित आहे. ते आधी मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) करता येणार नाही. जेव्हा युतीचं सरकार असतं, त्यावेळी काही निकष तयार करावे लागतात. कारण अनेक पक्ष सोबत असतात. त्यामुळे एका पक्षासाठी तो निकष लागू होत नाही. पण मला विश्वास आहे, भविष्यात जेव्हा विस्तार होईल, त्यावेळी निश्चितपणे त्यांचा विचार होईल.

एनडीए आज सरकार स्थापन करणार आहे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक खासदारांना मंत्रिपदासाठी फोन केल्याचंही समोर आलं आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीच आलबेल नसल्याचं चित्र आहे. सुनील तटकरे रायगड मतदारसंघातून निवडून आले आहेत. तर प्रफुल्ल पटेल राज्यसभेचे खासदार आहेत. या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ४ जागांवर निवडणूक लढवली होती. परंतु, राष्ट्रवादीचा एकाच जागेवर विजय झाला. सुनील तटकरे यांनी महायुतीचे उमेदवरा अनंत गीते यांचा पराभव केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com