'देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा झालेत' भाजप आमदार सुभाष देशमुख
राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात महिलांसाठी भरघोस निधी आणि विविध योजनांची घोषणा करण्यात आली. मुलीच्या जन्मापासून तिचे शिक्षण ते लग्नापर्यंत काळजी घेतली आहे. आता मुलींची चिंता देवेंद्र फडणवीस करणार आहेत काय माहित नाहीत, काय या वेळेस महिलांवर फिदा झालेत आहेत. असे अजब वक्तव्य राज्याचे माजी सहकार मंत्री आणि आमदार सुभाष देशमुख यांनी केले आहे
सुभाष देशमुख म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच अर्थसंकल्प मांडला, त्यामध्ये सर्वात जास्त महिलांवर लक्ष केंद्रित केलं आहे. मुलगी जन्माला आल्यावर तिचे स्वागत केले. मुलगी शिकायला गेल्यावर त्यालासुद्धा पैसे द्यायचं ठरवलं. परत पाचवी-सहावीला गेल्यावर पाच ते सहा हजार रुपये त्याच्या खात्यात जमा होतील. दहावीचे शिक्षण झाल्यावर मुलगी १८ वर्षानंतर तिला १५ किंवा १८ हजार रुपये मिळतील.
मुलींची चिंता आता देवेंद्र फडणवीस साहेब करणार आहेत. म्हणजे काय माहित नाही या वेळी महिलांवर फिदा झाले साहेब. देवेंद्र फडणवीस महिलांवर प्रचंड फिदा झालेत. महिलांच्या बचत गटासाठी देखील त्यांनी मुंबईत मॉल सुरू केला आहे. महिलांच्या बचत गटातील मालाला मुंबईत मार्केट मिळावं म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले आहे, असंही या वेळी सुभाष देशमुख म्हणाले.
सोलापूर शहरातील कल्याण नगर येथील रस्ते विकास कामाचे उदघाटन भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी बोलताना भाजप आमदार देशमुख यांनी हे विधान केले आहे.