Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाण्याची शक्यता

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाण्याची शक्यता

देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली.
Published by :
Siddhi Naringrekar

देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. मला सरकारमधून मोकळं करावं ही नेतृत्त्वाला विनंती आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीत अमित शाह, नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. उपमुख्यमंत्री पद सोडण्याच्या निर्णयावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com