Admin
बातम्या
देवेंद्र फडणवीस आशिष देशमुख यांच्या भेटीला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंबित काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची भेट घेतली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंबित काँग्रेस नेते आशिष देशमुख यांची भेट घेतली आहे. आशिष देशमुख यांना काँग्रेसमधून तात्पुरतं निलंबित केलं आहे. त्यामुळे ही भेट खूप महत्वाची मानली जाते.
फडणवीस आज नागपूर जिल्ह्यातील हिंगणा आणि उमरेड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र त्यापूर्वी ते देशमुखांच्या घरी पोहोचले आहेत. आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत नागपूरजवळच्या सावनेर मतदारसंघातून आशिष देशमुख यांना भाजपाचं तिकीट मिळणार का? अशा जोरदार चर्चा रंगल्या आहेत.