Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Team Lokshahi

नाशिकमधील खासगी बस आणि टँकर अपघातची घटना अतिशय दु:खद - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका येथे एका खासगी प्रवासी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत दहा ते बारा प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे. तर मृतांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. तब्बल 10 ते 12 प्रवाशी या भीषण दुर्घटनेत जिवंत जळाले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका येथे एका खासगी प्रवासी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत दहा ते बारा प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे. तर मृतांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. तब्बल 10 ते 12 प्रवाशी या भीषण दुर्घटनेत जिवंत जळाले आहेत.

याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना सोशल मिडियावर ट्विट केलं आहे की, नाशिकमध्ये खासगी बस आणि टँकर अपघाताची घटना अतिशय दु:खद आहे. मृतांच्या नातेवाईकांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आ. देवयानी फरांदे रुग्णालयात असून समन्वय साधत आहेत. असे फडणवीस यांनी सांगितले आहे.

नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका या ठिकाणी हा मोठा अपघात झाला आहे. अपघातात 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 38 प्रवासी जखमी झाले आहेत. नाशिक जवळ नांदूर नाका येथे बसला आग लागून हा मोठा अपघात झाला आहे. ही बस यवतमाळकडून मुंबईकडे जात होती. या बसची एका ट्रकला धडक लागल्यामुळं आग लागली. बसने पेट घेतल्यानं त्यामधील काही प्रवाशांचा मृत्यू झाला.

Devendra Fadnavis
नाशिक बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत मिळणार आणि घटनेची चौकशी होणार : मुख्यमंत्री
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com