ताज्या बातम्या
आमचं ठरलं होते, काल तो मूहूर्त निघाला; गप्पा मारण्यासाठी राज ठाकरेंची भेट घेतली - देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.
देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटींमुळे चर्चांना उधाण आले होते. याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीस म्हणाले की, खास गप्पा मारण्यासाठी शिवतीर्थावर गेलो. आमचं ठरल होते की एक दिवस गप्पा मारायला बसू आणि काल तो मूहूर्त निघाला आणि आम्ही गप्पा केल्या. आमचे असे ठरल होते की राजकीय सोडून गप्पा करायच्या असे फडणवीस म्हणाले.