शिंदे साहेब आणि मी मोदीसाहेबांकडे जाऊ आणि शिवरायांचं दिल्लीतील स्मारक मार्गी लावू - देवेंद्र फडणवीस
Admin

शिंदे साहेब आणि मी मोदीसाहेबांकडे जाऊ आणि शिवरायांचं दिल्लीतील स्मारक मार्गी लावू - देवेंद्र फडणवीस

रायगडावर मोठ्या दिमाखात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता.
Published by  :
Siddhi Naringrekar

रायगडावर मोठ्या दिमाखात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. त्या सोहळ्याला तिथीनुसार आज ३५० वर्षं पूर्ण झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा आज तिथीनुसार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर पार पडत आहे.

या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत. . त्यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय मंडळींनी शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर हजेरी लावली आहे.

याच पार्श्वभूमीवर या कार्यक्रमातून बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराज नसते तर आपण सर्व कुठं असलो असतो याचा विचार देखिल केला जात नाही. सज्जनांना अभय आणि दुर्जनांचा कडेलोट हेच शास्त्र छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलं. आम्ही मावळे आहोत. त्यामुळे शिंदे साहेब आणि मी मोदी साहेबांकडे जाऊ आणि महाराजांचे राष्ट्रीय स्मारक हे दिल्लीला झालं पाहिजे. ही भावना निश्चितपणे पूर्ण करु असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com