राजाचा जीव पोपटात, त्यामुळे काहीही झालं तर मुंबई महापालिका...; - देवेंद्र फडणवीस

राजाचा जीव पोपटात, त्यामुळे काहीही झालं तर मुंबई महापालिका...; - देवेंद्र फडणवीस

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे मुंबई दौऱ्यावर आहेत.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावर त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणीवस म्हणाले की, मुंबई महापालिका तिजोरी मुंबईकरांच्या हाती देत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. मुंबई महापालिका जिंकायची आहे ती कुणाला महापौर किंवा उपमहापौर बनवायला नाही तर मुंबई महापालिका आणि तिजोरी मुंबईकराच्या हातात द्यायची आहे. असे फडणवीस म्हणाले.

यासोबतच ते म्हणाले की, राजाचा जीव पोपटात आहे, दुसरा पोपट कोणता आहे तर बीएमसी . अडीच वर्षांनी आपल्या आशीर्वादाने शिवसेना आणि भाजप सरकार आलं आहे.पुढची 40 वर्षे रस्त्यावर खर्च करावा लागणार नाही म्हणून रस्ते काँक्रिट करायला हे विरोध करत आहेत. असेच मुंबईला लुटत गेले, खात गेले आहेत.हा राजकीय प्राण नाही, तर कुरण आहे. 25 वर्षे कुरण खाऊन हे मोठे झाले आहेत. ही महापालिका लुटून खाल्ली आहे. असा जोरदार हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com