पत्रकार शशिकांत वारिसेंच्या मृत्यूचे प्रकरण तापले; वारिसे प्रकरणात SIT गठीत करण्याचे फडणवीसांचे आदेश

पत्रकार शशिकांत वारिसेंच्या मृत्यूचे प्रकरण तापले; वारिसे प्रकरणात SIT गठीत करण्याचे फडणवीसांचे आदेश

कोकणात मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथे झालेल्या अपघाताला आता वेगळ वळण मिळाले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

कोकणात मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथे झालेल्या अपघाताला आता वेगळ वळण मिळाले आहे. रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या विरोधात बातमी देणारे पत्रकार शशिकांत वारीशे यांना गाडीने उडवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकार शशिकांत वारिसेंच्या मृत्यू प्रकरणी आता वारिसे प्रकरणात SIT गठीत करण्याचे फडणवीसांनी आदेश दिले आहेत.

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिले होते. राज्यात कायदा सुव्यवस्था आहे का? असा सवाल केला होता आणि त्यानंतर हे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. त्यामुळे आता फडणवीसांकडून SIT गठीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेत ही SIT गठीत करण्याचे आदेश त्यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com