Devendra Fadnavis : पुन्हा एकदा माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकरच निवडून येणार

Devendra Fadnavis : पुन्हा एकदा माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकरच निवडून येणार

माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज माळशिरस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा होती.
Published by :
Siddhi Naringrekar

माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज माळशिरस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा होती. या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इतक्या विराट संख्येने आपण सगळे एकत्र इथं आला आहात. माझ्या मनात कुठलीही शंका नाही. पुन्हा एकदा माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकरच निवडून येणार. रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी माननीय मोदी साहेबांच्या आशीर्वादाने जे जे शब्द दिलं होते. ते ते शब्द या ठिकाणी पूर्ण केलं. 50 - 60 वर्ष ज्यांना आपण नेतृत्व दिलं ते प्रत्येक निवडणुकीमध्ये तीच ती भाषण करायचं, तेच ते वादे करायचं, त्याच त्या घोषणा करायचं पण ते कधी पूर्ण झालं नाही. पण तुम्ही पहिल्यांदा मोदीजींच्यासोबत रणजितदादाला पाठवलं. या ठिकाणी पाणी देखील आलं, या ठिकाणी रेल्वे देखील आली आणि आता चिंता करु नका आता 36 गावांच्या पाण्याचा प्रश्न बाकी आहे हा माझा तुम्हाला शब्द आहे रणजितदादाच्यावतीने हे पाणी मोदी साहेबांच्यामाध्यमातून त्या ठिकाणी पोहचवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. वर्षानुवर्ष आपल्याला सांगितले जायचं कृष्णा - भीमा स्थिरीकरण. मलाही वाटलं मोठी योजना आहे. मुख्यमंत्री झालो फाईल उघडली तर लक्षात आलं त्याच्यावर लिहिलं होते पाणी उपलब्ध नाही, योजना बंद. करता येणार नाही.

यासोबत ते पुढे म्हणाले की, या ठिकाणी रणजितदादाला तुम्ही खासदार केलं. मी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी प्रयत्न सुरु केला. आता कृष्णेचं वाहून जाणारं पाणी हे उजनीमध्ये आणून त्या माध्यमातून या संपूर्ण भागाला सुजलाम सुफलाम करण्याचे काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे. मोदीजींसारखा नेता पाठिशी आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजना पाहतोय, सिंचनाच्या योजना पाहतोय हे सगळं या ठिकाणी संभव झालं मोदी साहेबांचं नेतृत्व आहे म्हणून. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो आता रणजितदादांच्या विरुद्ध पुन्हा एकदा जे उभे राहिले आहेत जरा त्यांचाही इतिहास बघा. मी तुम्हाला एक शब्द देतो. या तालुक्याला त्यांच्या दहशतीतून मी मुक्त करणार आहे. सामान्य माणसाला जो त्रास आहे. ज्या जमीनी बळकावल्या गेल्या आहेत. जे लोकांवर हल्ले झाले आहेत. हे सहन केलं जाणार नाहीत. ही लोकशाही आहे. ही ठोकशाही नाही आहे. इथं अशाप्रकारे ठोकशाही चालू दिली जाणार नाही.

मध्यंतरीच्या काळामध्ये सोलापूरला शरद पवार साहेब, सुशीलकुमार शिंदे साहेब आणि विजयदादा एकत्रित आले आणि एकत्रित येऊन सांगितलं, आम्ही 30 वर्षांनी एकत्रित आलो आहे, पुढच्या पिढीच्या भविष्याकरता एकत्रित आलो आहे. तुम्हाला वाटलं पुढची पिढी म्हणजे तुम्ही, पुढची पिढी म्हणजे तुम्ही नाही, तुमच्या भविष्याकरता नाही. पवार साहेब सुप्रिया ताईच्या भविष्याकरता, सुशीलकुमार शिंदे त्यांच्या मुलीच्या भविष्याकरता आणि विजयदादा हे रणजीतदादा आणि धैर्यशीलदादा यांच्या भविष्याकरता त्या ठिकाणी एकत्रित आलं. रामोशी समाजाच्या पाठिशी, धनगर समाजाच्या पाठिशी आणि सर्व समाजाच्या पाठिशी पूर्ण आमची महायुती उभी राहिल. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com