Devendra Fadnavis : मोदीजी कधीही बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करु शकत नाही

Devendra Fadnavis : मोदीजी कधीही बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करु शकत नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आंध्रप्रदेशमधील सभेतून टीका केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आंध्रप्रदेशमधील सभेतून टीका केली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख बाळासाहेब ठाकरेंचा नकली संतान असा केला होता. यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदीजी तुम्ही माझ्याशी लढा. पण माझ्या आई वडिलांचा अपमान केला तर मी सहन करणार नाही तुम्ही कोणीही असाल तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. हा माझा अपमान नाही. माझ्या देवतासमान, माझ्या वडिलांचा, माझ्या बाळासाहेबांचा अपमान आहे. असे म्हणाले.

यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मोदीजी कधीही बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करु शकत नाही. त्यांनी वारंवार सांगितले. हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्याकरता त्या ठिकाणी आदर्शच आहेत.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, पण आत्ताची स्थिती अशी आहे की उद्धव ठाकरेंचा तोल ढळला आहे. त्यांच्यावर मानसिक परिणाम झाला आहे. त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की, तात्काळ त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे नेलं पाहिजे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com