Devendra Fadnavis : 'वर्षा' बंगल्यावर राहायला कधी जाणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी सरळ सांगितले...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी का राहायला जात नाहीत? यावरुन आता अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता दोन महिने झालेत मात्र अजूनही फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी म्हणजे 'वर्षा' बंगल्यात राहयला गेलेले नाहीत.
याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, काय वेड्यांचा बाजार आहे की कोणाच्या घरची मालमत्ता आहे. शिंदे साहेबांनी वर्षा सोडल्यानंतर त्याठिकाणी मला जायचं आहे. त्याच्यापूर्वी काही छोटी- मोठी कामं तिथे चालू होती.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, दरम्यानच्या काळामध्ये माझी मुलगी दहावीच्या वर्गात आहे. 17 तारखेपासून तिची परीक्षा सुरु होते आहे. त्यामुळे ती म्हणाली माझी परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट करुया. म्हणून मी काही तिथे शिफ्ट झालो नाही. परीक्षा झाल्यानंतर त्याठिकाणी शिफ्ट होईन. पण इतक्या वेड्यासारख्या चर्चा मला तर वाटतं माझ्या स्तराच्या माणसांनी अशा चर्चांना उत्तरही देऊ नये अशा प्रकारच्या या चर्चा आहेत. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.