अनिल देशमुख यांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर; म्हणाले...

अनिल देशमुख यांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर; म्हणाले...

उद्धव ठाकरे आणि पवारांवर आरोप करा असे देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलं होतं.
Published by :
Siddhi Naringrekar

उद्धव ठाकरे आणि पवारांवर आरोप करा असे देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलं होतं. प्रतिज्ञापत्र करून दिल्यास ईडी, सीबीआय तुमच्या मागे लागणार नाही असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, योग्यवेळी ते सत्य मी बाहेर काढेन. आज त्यांना निवडणुकीच्या निमित्ताने सनसनी पसरवायची आहे पण ज्यावेळी सत्य मी बाहेर काढेन त्यावेळी त्यांच्या लक्षात येईल.

यासोबतच ते म्हणाले की, खरं म्हणजे या ठिकाणी जी काय घटना घडलेली आहे. त्या घटनेमध्ये ते सरकारमध्ये होते, त्यांचे सरकार त्या ठिकाणी होते. त्यांच्याच काळात बॉम्बचा आणि 100 कोटीचा घोटाळा झाला आणि त्यानंतर त्यांनी मला काय निरोप पाठवलं या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. काळजी करु नका. योग्यवेळी बाहेर काढेन. असे फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com