SA vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रेविसचा तुफानी खेळी, मोडला 'या' भारतीय खेळाडूचा विक्रम
SA vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रेविसचा तुफानी खेळी, मोडला 'या' भारतीय खेळाडूचा विक्रम SA vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रेविसचा तुफानी खेळी, मोडला 'या' भारतीय खेळाडूचा विक्रम

SA vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रेविसचा तुफान खेळी, 'या' भारतीय खेळाडूचा मोडला विक्रम

डेवाल्ड ब्रेविसची तुफान खेळी: ऑस्ट्रेलियाविरुद्ध 14 षटकार, विराटचा विक्रम मोडला.डेवाल्ड ब्रेविसची तुफान खेळी: ऑस्ट्रेलियाविरुद्ध 14 षटकार, विराटचा विक्रम मोडला.
Published by :
Riddhi Vanne
Published on

SA vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेचा शेवटचा सामना गमावूनही दक्षिण आफ्रिकेचा तरुण तडाखेबाज डेवाल्ड ब्रेविसने सर्वांची मनं जिंकली आहेत. एडन मार्करमच्या नेतृत्वाखाली आफ्रिकेला मालिका 1-2 ने गमवावी लागली. मात्र ब्रेविसच्या तुफानी खेळीमुळे मालिकेत रंगत निर्माण झाली.

तिसऱ्या सामन्यात ब्रेविसने केवळ 26 चेंडूत 53 धावा फटकावल्या. या खेळीत त्याने 6 षटकार आणि 1 चौकार लगावला. याच जोरावर त्याने विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडत इतिहास रचला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज तो ठरला आहे. यापूर्वी हा मान विराट कोहलीकडे होता.

ब्रेविसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ 3 डावात 14 षटकार ठोकले. तर कोहलीने 10 डावात 12 षटकार मारले होते. यादीत विराट आता दुसऱ्या स्थानी आहे. शिखर धवन आणि आंद्रे रसेल यांनी 9-9 षटकारांसह तिसरे स्थान मिळवले आहे. इंग्लंडच्या रवी बोपाराने 3 डावात 7 षटकार मारून चौथे स्थान पटकावले.

डेवाल्ड ब्रेविसने या मालिकेत केवळ षटकारांचा विक्रमच नव्हे तर धावांचीही विक्रमी कामगिरी केली. त्याने 3 सामन्यांत एकूण 180 धावा ठोकत बाबर आझमचा विक्रम मोडला. बाबरने 2018-19 मालिकेत 163 धावा केल्या होत्या. कोहलीने 2015-16 मध्ये 199 धावा करून पहिल्या क्रमांकावर आपले स्थान मजबूत केले होते. ब्रेविसच्या या कामगिरीनंतर त्याला भविष्यातील ‘Mr. 360’ म्हणून संबोधले जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com