IndiGo : इंडिगोला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा दणका; ठोठावला 'इतक्या' कोटींचा दंड
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(IndiGo ) इंडिगोला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने मोठा धक्का दिला आहे. डिसेंबर अनेक विमानांचे उड्डाण रद्द झाले होते. प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागला होता. अनेक विमानांचे उड्डाण रद्द झाले होते.
त्यामुळे शेकडो प्रवासी विमानतळांवर अडकल्याचे पाहायला मिळाले. 3 ते 5 डिसेंबर दरम्यान झालेल्या गोंधळाची चौकशी करण्यासाठी डीजीसीएने चार सदस्यांची समिती स्थापन केली होती. यानंतर आता ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने इंडिगोला दणका देत 22.20 कोटी रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. डिजीसीएने याबद्दलचे एक निवेदन देखील प्रसिद्ध केले आहे.
Summary
इंडिगोला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचा दणका
डिसेंबर अनेक विमानांचे उड्डाण रद्द झाले होते
डिसेंबरमधील ढिसाळ कारभाराबद्दल ठोठावला 22 कोटींचा दंड
