धैर्यशील मोहिते पाटील घेणार शरद पवार यांची भेट; म्हणाले...

धैर्यशील मोहिते पाटील घेणार शरद पवार यांची भेट; म्हणाले...

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आज धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. मोहिते पाटलांसोबत उत्तम जानकार ही शरद पवारांना भेटणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की, मला साहेबांनी माढा लोकसभा मतदारसंघातील रणनिती ठरवण्यासाठी सभा कुणाच्या लावायच्या त्या दृष्टीकोनातून बोलावलं आहे. माळशिरसमधल्या जनतेला वाटतं की सगळ्यांनी एकत्र यावे. रघुनाथ राजे निंबाळकर कालच्या सभेचे अध्यक्ष होते. माढा लोकसभेची दिशा ठरवण्यासाठी आज शरद पवार यांची भेट घेत आहे. असे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com