चैत्यभूमी आणि दिक्षाभूमीच्या पार्श्वभूमीवर साकारली "धम्म भूमी"
admin

चैत्यभूमी आणि दिक्षाभूमीच्या पार्श्वभूमीवर साकारली "धम्म भूमी"

चैत्यभूमी आणि दिक्षाभूमीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील गुगवाड याठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशी "धम्म भूमी"उभारण्यात आली आहे.

संजय देसाई, सांगली: चैत्यभूमी आणि दिक्षाभूमीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील गुगवाड याठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशी "धम्म भूमी"उभारण्यात आली आहे. शानदार सोहळ्यात बौद्ध समाजातील धार्मिक नेत्यांच्या हस्ते धम्म भूमीचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. यावेळी हजारो बौद्ध समाज बांधव उपस्थित होते.

सांगलीच्या जत तालुक्यातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील गुगवाड याठिकाणी सुमारे वीस एकर क्षेत्रामध्ये सामजिक कार्यकर्ते सी.आर.सांगलीकर यांच्या माध्यमातून ही भव्य -दिव्य धम्म भूमी उभारण्यात आली आहे. आज शानदार सोहळयात भदंत बोधी पालव महाथेरो आणि भिक्षुक संघ यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यासाठी सांगली, कोल्हापूर, सातारा,सोलापूर जिल्हासह शेजारच्या कर्नाटक राज्यातून हजारो बौद्ध बांधव उपस्थित होते.

या धम्म भूमीवर आता बुद्ध विहार, भिकू ट्रेनिंग सेंटर, लायब्ररी, यूपीएससी एमपीएससी ट्रेनिंग सेंटर देखील सुरू करण्यात आले आहे. बुद्ध विहारची इमारत शंभर फूट बाय शंभर फूट अशी दोन मजली उंच आणि चाळीस फूट बाय 40 फूट अश्या आकाराची ही इमारत असुन याठिकाणी थायलंड वरून बारा फूट उंचीची पंचधातूच्या बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. बौद्ध समाजासाठी आणि तरुण पिढीला ही धम्म भूमी प्रेरणा देणारी ठरेल,असा विश्वास यावेळी बौध्द समाजातील भदंत,भिकू यांनी व्यक्त केला आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com