ताज्या बातम्या
Dhananjay Deshmukh : 'कृष्णा आंधळेला लवकर अटक करुन फाशी द्या'
धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात बोलताना धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करा. पुढील कारवाई करुन त्याला लवकर फाशी द्या.
ग्रामस्थांची उद्या महत्त्वाची बैठक आहे. त्या मिटींगमध्ये ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही उणीव आहेत यावर सविस्तर चर्चा होईल आणि त्या मागण्या आम्ही सविस्तर अधिकाऱ्यांच्या पुढे मांडू. आता जे तपास चालू आहेत. तो तपास योग्य दिशेनं चालावा. निष्पक्षपातीपणे चालावा.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, आम्ही वेळोवेळी विनंती करत आहे. या तपासाच्या भागातून जे काही पुढे येणार आहे. त्यावर आम्ही प्रतिक्रिया वेळोवेळी देऊ पण आज आम्ही जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेकडे एकच मागणी करतो आहे की, लवकरात लवकर आरोपीला पकडून आम्हाला न्याय द्या. असे धनंजय देशमुख म्हणाले.