Dhananjay Munde Vs Karuna Sharma : "दोघांचं लग्न अधिकृत नाही", धनंजय मुंडेंच्या वकिलाचा अजब युक्तिवाद
मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या नात्याबद्दल सध्या प्रश्न उपस्थित राहिले आहेत. करुणा शर्मा यांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याबद्दल वांद्रे सत्र न्यायालयात अंतरिम आदेशाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज माझगांव सत्रन्यायालयात सुनावणी झाली. यावेळी करुणा शर्मा यांच्या वकिलाने अनेक युक्तिवाद मांडले आहेत. तसेच धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचा विवाह अधिकृत नाही असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केला आहे.
धनंजय मुंडे यांच्या वकिलांचा युक्तिवाद :
धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्याशी अधिकृत लग्न केलंच नाही. मग धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या दोन मुलाची आई आणि वडील कोण आहेत? तसेच धनंजय मुंडे यांनी मुलांना स्वीकारलं आहे पण त्यांच्या आईशी लग्न केलेलं नाही, असेही धनंजय मुंडे यांचे वकील म्हणाले. 15 लाखच्या जवळपास वर्षाला इन्कम करुणा शर्मा यांचा आहे त्या इन्कमटॅक्स भरतात. त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत तरी त्यांनी पोटगीसाठी अर्ज केला. धनंजय मुंडे यांचा एक लग्न झालेला आहे त्यामुळे दुसरं लग्न त्यांनी केलेला नाही, धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचे संबंध परस्पर संमतीने होते हे कुठेही लपवले नाही. फक्त धनंजय मुंडे यांचं करुणा शर्मा यांच्यासोबत लग्न झालेलं नाही. करुणा शर्मा आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे, त्यांनी निवडणूकसुद्धा लढवली असल्याचे धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी युक्तिवाद मांडला आहे.
सुनावणीची पुढील तारीख समोर :
करुणा शर्मा यांचे धनंजय मुंडे यांच्यासोबत लग्न झाले ज्याचे तुमच्याकडे पुरावे काय आहेत?, असा सवाल न्यायाधीशांकडून करुणा शर्मा यांच्या वकीलाला विचारण्यात आला. यावर हे सगळे पुरावे आम्ही सादर करु आम्हाला वेळ हवा आहे, असं करुणा शर्माच्या वकीलांनी सांगितले. यानंतर पुढील तारखेपर्यंत आपण पुरावे सादर करा, असा न्यायालयाने सांगितले आणि पुढील सुनावणी 5 एप्रिलला ठेवण्यात आली आहे.