Anjali Damaniya Vs Dhananjay Munde : धनंजय मुंडे आणि ठक्कर पंकजा मुंडे यांच्याविरोधात फाईल घेऊन आले, अंजली दमानियांचा दावा
अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्याविरोधात एक नवा गौप्यस्फोट केला आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय पोपट घनवट यांनी बीडमधील शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. तसेच 4-5 वर्षांपूर्वी धनंजय मुंडे आणि तेजस ठक्कर नावाची व्यक्ती हे स्वत: पंकजा मुंडे यांच्याविरोधातील काही फाईल्स माझ्या घरी आले होते. असा मोठा खुलासा देखील अंजली दमानिया यांनी केला आहे.
यादरम्यान अंजली दमानिया म्हणाल्या की, "धनंजय मुंडे स्वत: 4-5 वर्षांपूर्वी माझ्या घरी एक तेजस ठक्कर नावाच्या व्यक्तीसोबत आले होते. त्यावेळी ते पंकजा मुंडेंविरोधातल्या फाईल्सचा एक मोठा बंच घेऊन आले होते. ते फाईल्स घेऊन येण्याआधी मला तेजस ठक्कर, राजेंद्र घनवट यांचा फोन आला होता. ज्यावेळेस धनंजय मुंडे माझ्याकडे फाईल्स घेऊन आले तेव्हा मी त्यांना स्पष्ट केलं होत की, मी अशा दिलेल्या फाईल्सवर कधीही काम करत नाही, त्यामुळे मी पंकजा मुंडे यांचा कुठलाही विषय लावून धरला नव्हता".
"त्यानंतर मी आता जसा बीडचा प्रकरण लावून धरला तेव्हा मी राजेंद्र घनवट यांच नाव एका चॅनेलमध्ये घेतलं होत. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यावेळी मला हे समजलं की, राजेंद्र घनवट या व्यक्तीने शेतकऱ्यांचा छळ केला आहे. राजेंद्र घनवट धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे आहेत. यांनी मिळून 11 शेतकऱ्यांना छळून त्यांच्या कोट्यवधीच्या जमिनी कवडीमोल भावात घेतल्या. ज्यावेळी शेतकरी विरोधात गेले त्यांच्याविरोधात या लोकांनी मिळून त्या शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. एवढचं नव्हे तर मृत शेतकऱ्यांना जिवंत दाखवून जमिनीवर अधिकार गाजवला". असं अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.