धनंजय मुंडे यांच्या आईबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी, सायबर सेलमध्ये तक्रार दाखल

काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या आईबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
Published by :
Team Lokshahi

बीडमधील मंत्री धनंजय मुंडे सध्या खुप चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या आईबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. एका अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियावर ही आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या सगळ्यांची माहिती मिळताच धनंजय मुंडे यांचे चुलत अजय मुंडे यांनी बीडच्या सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.

धनंजय मुंडे यांच्या आई रुख्मिणीबाई पंडितराव मुंडे यांच्या नावाचा वापर करुन सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली होती. याबद्दल धनंजय मुंडे यांचे बंधू आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे यांनी पुराव्यांसह सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. अजय मुंडे यांनी टिप्पणीबाबतची माहिती आणि पुरावे सादर केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात यूट्यूबधारकावर गुन्हा नोंदवला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com