All is well आहे का? धनंजय मुंडे म्हणतात Perfectly well
Admin

All is well आहे का? धनंजय मुंडे म्हणतात Perfectly well

राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.

राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवार भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे.

यातच आता राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार धनंजय मुंडे मतदारसंघातील कामासाठी मी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सचिवांना भेटले असे सांगितले आहे. सकाळपासून धनंजय मुंडे नॉट रिचेबल असलाच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र धनंजय मुंडे हे मंगलप्रभात लोढा यांच्या कार्यालयात आले होते.

त्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे म्हणाले की, मी मतदारसंघातील कामासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सचिवांना भेटलो. त्यानंतर माध्यमांनी त्यांना विचारले की, All is well आहे का? यावर उत्तर देताना धनंजय मुंडे Perfectly well असं म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com