Dhananjay Munde - raj ThackerayTeam Lokshahi
ताज्या बातम्या
धनंजय मुंडेंनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली, म्हणाले...
ह्रदयविकाराच्या धक्क्यातून बरे होताच धनंजय मुंडेंनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे.
ह्रदयविकाराच्या धक्क्यातून बरे होताच धनंजय मुंडेंनी (dhananjay munde) राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या (congress) राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेची इस्लामपूर (islampur) येथील जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी जोरदार भाषण करून भाजपावर निशाणा साधला. या सभेत धनंजय मुंडेसुद्धा (dhananjay munde ) उपस्थित होते. या सभेत बोलताना मुंडेनी राज ठाकरेंवर (raj thackeray ) टिकास्त्र सोडलं आहे.
धनंजय मुंडे म्हणाले की, 'पूर्वी रामदास पाध्याय यांचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरू आहे. अर्धवटरावांचा खेळ सुरू आहे' यासोबतच ते म्हणाले की,अर्धवट राव आधी भाजपविरोधात खूप बोलायचे, सीडी लावायचे. एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले.