Dhananjay Munde : ऐतिहासिक मतांनी पंकजाताई निवडून येतील, असा विश्वास मला आहे

Dhananjay Munde : ऐतिहासिक मतांनी पंकजाताई निवडून येतील, असा विश्वास मला आहे

धनंजय मुंडे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

धनंजय मुंडे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे म्हणाले की, मनातून अतिशय आनंद होत आहे. 2009नंतर पंकजा ताईंना विधानसभेत मतदान केल्यानंतर आज पुन्हा त्या लोकसभेला उभ्या राहिल्या आहेत. या ठिकाणी आज त्यांच्या प्रचाराची पूर्ण जबाबदारी असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घेतली.

आज मतदान करताना त्यांना जे समाधान आणि आनंद होत आहे. ती भावना माझी आहे. आज गेल्या 45 दिवस जे कष्ट घेतलं आज मतदान केल्यानंतरचं जे एक समाधान असते ते आ ठिकाणी मिळालं. परिवार अनेक वर्षानंतर, अनेक वर्षाच्या संघर्षानंतर एकरुप झाला. परिवार एकरुप झाल्यानंतर विचाराचंसुद्धा आमच्या दोन्हीही वेगवेगळी विचारधारा होती त्याचे एक गठबंधन झालं.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, महायुतीमध्ये आम्ही गेल्यानंतर स्वाभाविक राजकीयदृष्ट्यासुद्धा आम्ही कुटुंब अगोदरच एक झालो होतो आता राजकीयही या ठिकाणी एक होऊन. आज पंकजाताई लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. ऐतिहासिक मतांनी पंकजाताई निवडून येतील. असा विश्वास मला आहे. असं धनंजय मुंडे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com