Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांचं अखेर ठरलं..? फेसबुकवर फोटोसोबत मजकूर, नेमकं काय लिहिलं ?
रवींद्र धंगेकर यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. सध्या मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर कॉंग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर फार चर्चेत आले. त्या भेटी दरम्यान त्यांनी हे स्पष्ट केल होत की, ही भेट केवळ वैयक्तिक कामासाठी घेण्यात आली होती. अस असताना रवींद्र धंगेकर यांचं व्हॉट्सअॅप स्टेट्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल.
ज्यात त्यांनी गळ्यात भगवं उपरणं परिधान केलेलं होत आणि 'राजा हरला काय राजा जिंकला काय, राजा हा राजा असतो...निष्ठेत तडजोड नाही' असा मजकूर देखील लिहलेला होता. या स्टेटसमुळे धंगेकर पुन्हा चर्चेत आले. रवींद्र धंगेकर लवकरच शिवसेनेत जाणार का? अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र आता त्या चर्चांना रविंद्र धंगेकर यांनी पुर्णविराम दिल्याचे त्यांच्या फेसबुक फोटोवरून आणि त्यावरील मजकूरावरून दिसून येत आहे.
त्यांनी फेसबुक प्रोफाईलचा फोटो बलला आहे तर या फोटोमध्ये त्यांनी भगवी टोपी आणि भगवा उपरणं परिधान केल्याचं दिसून येत आहे. तसेच त्यांनी मजकूरात 'हे नाव पुन्हा ऐकण्याची तयार ठेवा' असं लिहल आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत धंगेकर पक्षबदल करण्याची शक्यता आहे. पण यामुळे आता राजकीयवर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.