Dharavi Cylinder Blast : धारावी सिलिंडर स्फोट प्रकरण; अनधिकृत पार्किंगचा मुद्दा समोर; नेमकं प्रकरण काय?

Dharavi Cylinder Blast : धारावी सिलिंडर स्फोट प्रकरण; अनधिकृत पार्किंगचा मुद्दा समोर; नेमकं प्रकरण काय?

मुंबईच्या धारावी परिसरामध्ये सिलेंडरचे स्फोट झाले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मुंबईच्या धारावी परिसरामध्ये सिलेंडरचे स्फोट झाले. रस्त्याच्याकडेला बेकायदेशीरपणे दुहेरी पार्किंगमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक उभा करण्यात आला होता. सोमवारी रात्री अचानक गॅस सिलिंडरच्या ट्रकला आग लागली. या आगीत ट्रकमधील सिलिंडरचे स्फोट होऊ लागले. या दुर्घटनेत सुमारे 9 ते 10 गाड्यांचे नुकसान झाले आहे.

याच मुंबईच्या धारावी परिसरामध्ये सिलेंडरचे स्फोट प्रकरणानंतर अनधिकृत पार्किंगचा मुद्दा समोर येत आहे. अनेक ठिकाणी अनधिकृत पार्किंग केलेली असते. या धारावी सिलेंडर प्रकरणामध्ये एक माहिती समोर येत आहे ती म्हणजे तरबेज शेख नावाची एक व्यक्ती अशा पद्धतीने पैसे घेत होता. तरबेज शेख हा जिथे नो पार्किंग आहे त्याठिकाणी वाहन पार्क करायला देऊन पैसे घेत असल्याची माहिती मिळत आहे.

यामध्ये हा तरबेज शेख गॅस एजन्सीच्या ट्रक, टेम्पो चालकाकडून महिन्याला हजार ते दोन हजार घेत होता तर रिक्षा चालकाकडून चाळीस ते शंभर रुपये घेत असल्याची माहिती मिळत आहे. नो पार्किंग तसेच डबल पार्किंगमध्ये वाहने लावणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरु आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com