कल्याण शीळ रस्त्यात बधितांचे आजपासून बेमुदत धरणे आंदोलन, मोबदला मिळाला नाही तर...; बधितांचा इशारा

कल्याण शीळ रस्त्यात बधितांचे आजपासून बेमुदत धरणे आंदोलन, मोबदला मिळाला नाही तर...; बधितांचा इशारा

कल्याण शीळ रोड रुंदीकरणात बाधित झालेल्या ग्रामस्थांना अद्याप मोबदला न मिळाल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्र घेतलाय .आज पासून बाधित ग्रामस्थानी कल्याण शीळ रोडवर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अमदज खान, कल्याण

कल्याण शीळ रोड रुंदीकरणात बाधित झालेल्या ग्रामस्थांना अद्याप मोबदला न मिळाल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्र घेतलाय .आज पासून बाधित ग्रामस्थानी कल्याण शीळ रोडवर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे. शासनाच्या नियमानुसार मोबदला मिळाला नाही तर कुटुंबासह रस्त्यावर उतरून रास्ता रोको, उग्र आंदोलन करू असा इशारा या ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलाय.

वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या कल्याण शीळ रस्त्याचे सहा पदरी रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण काम हाती घेण्यात आलंय .मात्र चार वर्षे उलटूनही या रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे वाहन चालकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येतोय. त्यातच आता रुंदीकरणात बाधित झालेल्या ग्रामस्थांना अद्याप मोबदला न मिळाल्याने ग्रामस्थांनी देखील आक्रमक पवित्र घेतलाय .त्यामुळे या रस्त्याचं सुरू असलेले काम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलयं . या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामात रस्त्यालगतच्या पंधरा गावांमधील २०० ते २५० शेतकरी बाधित होत आहेत.

गेल्या चार वर्षांपासून हे बाधित मोबदला मिळावा यासाठी शासनाचे उंबरठा झिजवतायत मात्र अद्याप त्यांना मोबदला मिळाला नाही. प्रत्येक वेळी केवळ आश्वासनावर बोळवण केली जात असल्याचा आरोप बधितानी केला आहे .अखेर ग्रामस्थानी याबाबत आक्रमक पवित्रा घेतला सर्व पक्षीय युवा मोर्चाच्या नेतृत्वाखाली बाधितानी आजपासून बेमुदत धरने आंदोलन सुरू केले. यावेळी आज लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय, लवकरात लवकर मोबदला मिळाला नाही तर कुटुंबासह रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करू असा इशारा या ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com