Dheeraj Kumar Passed Away : अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक धीरज कुमार यांचे निधन ; 79वर्षी घेतला अखेरचा श्वास
चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध जेष्ठ अभिनेते धीरज कुमार यांचे वयाच्या 79वर्षी आज सकाळी 11.40 वाजता निधन झाले. त्यांना निमोनिया झाल्यामुळे अंधेरीमधील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
सिद्ध बॉलीवूड, टेलिव्हिजन अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक धीरज कुमार यांचे निधन झाले आहे. शनिवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना तातडीने अंधेरीमधील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 80 च्या दशकांमधील खूपच लोकप्रिय असलेले जेष्ठ अभिनेते धीरज कुमार यांनी त्याकाळी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या.
धीरज कुमार यांनी 1965 मध्ये कलाविश्वात पाऊल ठेवलं. त्यांनी ‘हिरा पन्ना’, ‘रातों के राजा’ यासारख्या चित्रपटात दमदार अभिनय केला. याशिवाय रोटी कपडा और मकान’, सरगम, क्रांती, दिदार, बहारो फुल बरसाओ या आणि अश्या अनेक चित्रपटात काम केले. अभिनयाबरोबरच त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रांतही आपला ठसा उमटवला. त्याचबरोबर त्यांनी केवळ चित्रपटामध्येच नाही तर इंडियन टेलिव्हिजनवर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले. ‘क्रिएटिव्ह आय’ नावाने निर्मिती संस्था स्थापन केली. ओम नम: शिवाय’, ‘श्री गणेश’, ‘जय संतोषी माँ’ आणि ‘जप तप व्रत’ 'शोभा सोमनाथ की ' अश्या मालिकांची निर्मिती केली.त्यांनी केवळ हिंदीमध्येच नाही तर तब्बल 21 पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे. चार दिवसांआधी त्यांची प्रकृती खराब होण्यापूर्वी त्यांनी इस्कॉन मंदिराला भेट दिली होती.
मागील तीन दिवसांपूर्वी मुंबईतील अंधेरी येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. 79 वर्षीय धीरज कुमार यांना तीव्र न्यूमोनिया झाला होता. धीरज कुमार काल रात्रीपासून व्हेंटिलेटर सपोर्टवर होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात कुटुंबात त्यांची पत्नी झुबी कोचरआणि 18 वर्षांचा मुलगा आशुतोष आहे.धीरज कुमार यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार केले जातील . त्यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपट सृष्टीमध्ये आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.