NCP मध्ये भूकंप! बड्या नेत्याचा थेट राजीनामा, पक्ष गोंधळात

NCP मध्ये भूकंप! बड्या नेत्याचा थेट राजीनामा, पक्ष गोंधळात

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आज, 30 डिसेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असल्याने दिवसभर मोठी धावपळ पाहायला मिळाली.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Dhule Municipal Corporation Election : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आज, 30 डिसेंबर हा उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असल्याने दिवसभर मोठी धावपळ पाहायला मिळाली. अनेक इच्छुक उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, काही ठिकाणी जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते डावलले गेल्याने नाराजीचा सूर उमटला. तर काही ठिकाणी नव्याने आलेल्या नेत्यांना थेट तिकीट दिल्यामुळे वाद निर्माण झाल्याचेही दिसून आले.

या सगळ्या घडामोडींमध्ये अनेक नेते शेवटच्या टप्प्यावर पक्ष बदलताना दिसले. राजकीय गणित पाहून काहींनी आजही आपली भूमिका बदलली. अशाच घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. पक्षातील महत्त्वाच्या नेत्याने साथ सोडल्यामुळे पक्षासमोर अडचण निर्माण झाली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच त्यांनी हा निर्णय घेतला.रणजित भोसले यांच्या पत्नी उज्ज्वला भोसले या धुळे येथील प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. पत्नीच्या प्रचारासाठी आणि विजयासाठी त्यांनी पक्ष बदलल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीसमोर नवी अडचण

अगदी शेवटच्या क्षणी भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आता ते पूर्ण ताकदीनिशी पत्नीच्या विजयासाठी काम करणार असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, शरद पवार यांच्या पक्षासाठी ही घटना अडचणीची ठरली आहे. या घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस ही पोकळी कशी भरून काढणार आणि निवडणुकीसाठी पुढची रणनीती काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

थोडक्यात

• महानगरपालिका निवडणुकीसाठी आज, 30 डिसेंबर, उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस
• दिवसभर पक्षांमध्ये मोठी धावपळ आणि उत्साह
• इच्छुक उमेदवार शेवटच्या क्षणापर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी प्रयत्न
• काही ठिकाणी जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते डावलल्याने नाराजी
• नव्याने आलेल्या नेत्यांना तिकीट दिल्यामुळे वाद निर्माण

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com