Admin
बातम्या
Dhulivandan : फुगे माराल तर, गुन्हे दाखल करण्याचे पोलिस आयुक्तांचे आदेश
फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री विधिपूर्वक होळी पेटवली जाते.
फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री विधिपूर्वक होळी पेटवली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा होळी विझलेली असते, तेव्हा तेथील राख एकमेकांच्या अंगाला लावून धुळवड खेळून नंतर आंघोळ केली जाते. धुलिवंदन हा होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते. त्याच दिवशी रंगपंचंमीप्रमाणे रंगोत्सव साजरा करतात.
याच पार्श्वभूमीवर आता धुलिवंदन साजरे करताना रंग भरलेले फुगे मारले जातात. पण नागपुरात यंदाच्या धुळवडीत रंग भरलेले फुगे फेकून मारल्यास थेट गुन्हा दाखल होणार आहे. नागपूर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे.
हे फुगे मारल्यामुळे अनेकदा अपघात होण्याची भीती होते. त्यामुळे आयुक्तांनी त्याविरोधात तक्रार आल्यास कारवाईचे आदेश दिले आहेत.