Balasaheb Thackeray : बाळासाहेबांनी खुद्द राजीनामा देत शिवसेना सोडली होती ? काय प्रकरण नक्की वाचा...
तुम्ही कधी ऐकलं का ? बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः हा शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. यावर विश्वास बसणार नाही पण हो ही गोष्ट खरी आहे. पण हा बाळासाहेब यांना हा राजीनामा देण्याची वेळ का आली चला जाणून घेऊ या बातमीच्या माध्यमांतून...
ज्यांच्याशिवाय भारतीय राजकारण पूर्ण होऊ शकत नाही त्यापैकी एक धुरंदर व्यक्तीमत्त्व म्हणजे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. आपल्या निपूण राजकारणासाठी, वक्तृत्वासाठी जसे बाळासाहेब ओळखले जातात तसेच त्यांच्या धक्कातंत्रासाठी हे चांगलेच ओळखले जात. शिवसेना पक्षातून राजीनामा देण्याचे धक्कातंत्र बाळासाहेबांनीच दिले होते. 1966 साली बाळासाहेबांनी शिवसेना या पक्षाची स्थापना केली होती. पंरंतु त्यांच्याच कारकीर्दीत त्यांनी दोनदा पक्ष सोडण्याचे जाहीर केले होते. परंतु बाळासाहेब हे शिवसैनिकांसाठी देव झाले होते आणि शिवसैनिक आपल्या देवाला सोडायला तयार नव्हते.
1976 आणि 1992 असे दोन वेळा बाळासाहेबांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला होता. १९७८ साली विधानसभा निवडणूकीत पराभव मिळाल्याने त्याच वर्षी होणार्या मुंबई महानगर पालिकेची निवडणूक बाळासाहेबांनी प्रतिष्ठेची केली. ‘जर या निवडणूकीत शिवसेनेला यश नाही मिळाले तर मी शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा देईन’ असे बाळासाहेबांनी जाहीर केले. परंतु आणिबाणीनंतर जनता पक्ष जोरात होता. मुंबईकरांनी शिवसेनेच्या ऐवजी जनता पक्षाला साथ दिली. 1973 साली शिवसेनेला पालिका निवडणूकीत 40 नगरसेवक निवडून आले होते. 1975 साली ही संख्या निम्मी होऊन 21 वर आली.
यावर शिवाजी पार्कातल्या सभेत मुंबई पालिकेवर भगवा फडकवण्यास मी अपयशी ठरलो, लोकांची माझ्यावर निष्ठा राहिली नाही, शब्दाला जागणारा मी माणूस आहे म्हणून मी पक्षाचा राजीनामा देतो’ असे म्हणून त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना धक्का दिला. पण शिवसैनिक भावुक झाले आणि म्हणाले " आमच्या प्रेतावरून जा, पण राजीनामा देऊ नका! पण बाळासाहेब ठाम होते अखेर शिकसैनिकांनी प्रतिज्ञा केली मुंबई महापालिकेतला भगवा कधीच खाली पडु देणार नाही, तेव्हा कुठे बाळासाहेबांनी राजीनामा मागे घेतला. आणि शिवसैनिकानी देखील दिलेलाशब्द खरा केला. 1985 ते 2022 आजतागायत मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर बसला परंतु यंदाच्या निवडणुकीत शिवसैनिक बाळासाहेबांना दिलेला शब्द पाळतील का ? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
थोडक्यात
भारतीय राजकारणात ज्यांच्याशिवाय चर्चा पूर्ण होऊ शकत नाही, अशी धुरंदर व्यक्तीमत्त्व म्हणजे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
निपूण राजकारण, धारदार वक्तृत्व आणि धक्कातंत्रासाठी बाळासाहेब ओळखले जात.
शिवसेना पक्षातून राजीनामा देण्याचा धक्का बाळासाहेबांनीच दिला होता, ही बाब अनेकांना आजही आश्चर्यचकित करणारी.
1966 साली शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली.
त्यांच्या दीर्घ राजकीय कारकीर्दीत दोन वेळा त्यांनी शिवसेना सोडण्याची जाहीर घोषणा केली होती.
मात्र प्रत्यक्षात बाळासाहेबांनी शिवसेना कायमची कधीच सोडली नाही.
शिवसैनिकांसाठी बाळासाहेब हे देवाप्रमाणे होते.

