तुमच्या आज्जीने सावरकरांचं पत्र वाचलं नव्हतं का? आनंद दवेंचा राहुल गांधींना सवाल

तुमच्या आज्जीने सावरकरांचं पत्र वाचलं नव्हतं का? आनंद दवेंचा राहुल गांधींना सवाल

काँग्रेसची भारत जोडो यात्रा राहुल गांधी यांच्या नेत्तृत्वात महाराष्ट्रात आली आहे. महाराष्ट्रात या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
Published by :
shweta walge

काँग्रेसची भारत जोडो यात्रा राहुल गांधी यांच्या नेत्तृत्वात महाराष्ट्रात आली आहे. महाराष्ट्रात या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी या यात्रेत स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. यावरुनच आता हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी राहुल गांधींनी त्यांच्या आजीने सावरकरांना लिहिलेलं हे पत्र वाचलं नव्हतं का, असा प्रश्न केला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज महाराष्ट्रभर उमटत आहेत. त्यातच राहुल गांधी यांनी सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेलं पत्र माझ्याकडे असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. इंग्रजीत असलेल्या या पत्रात, सर मै आपका नौकर रहना चाहता हूँ… असं लिहिल्याचं राहुल गांधी म्हणाले. अलोका येथील पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी एक कागदपत्र दाखवत हेच ते सावरकरांचे ब्रिटिशांना लिहिलेले पत्र असल्याचा दावा केला.

काय म्हणाले आनंद दवे, देवेंद्र फडणवीस यांना वाचायचं असेल तर हे पत्र वाचावं. इंग्रजांना सावरकरांनी मदत केली होती, असा दावा राहुल गांधी यांनी पुन्हा केला. त्यावरून आनंद दवे यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे.

आनंद दवे यांनी इंदिरा गांधी यांनी सावरकरांसाठी लिहिलेलं एक पत्र सादर केलं. इंदिरा गांधी यांनी स्वतःच्या खात्यातून 11000/- ची देणगी प्रतिष्ठानला दिली होती. ती काय कोणाला घाबरून दिली होती का ?असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच पत्रात सावरकरांना धाडसी असा उल्लेख आहे. त्या बाबत राहुल गांधी काय बोलणार आहेत? असा सवाल दवे यांनी केला.

सावरकर यांनी माफी मागितली हे निश्चितच खरं आहे. कारण बाहेर येऊनच ते काम करू शकले असते. पण त्या पत्रात एकवेळ मला सोडू नका पण इतरांना तरी सोडा असंही वाक्य आहे. या वाक्याबाबत राहुल जी काय बोलणार आहेत, असा सवालही आनंद दवे यांनी केला आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

एकीकडे देशासाठी अवघ्या २४ व्या वर्षी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत, ज्यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली. अंदमान तुरुंगातील शिक्षा कमी करण्यासाठी सावरकरांनी अनेकवेळा इंग्रज सरकारला माफीची पत्रे लिहिली, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. वाशिमच्या मालेगावात क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com