पुष्पा-२ मधील ६ मिनीटांच्या सीनसाठी ६० कोटींचा खर्च, असं आहे तरी काय या सीनमध्ये?
बहुप्रतिक्षित पुष्पा चित्रपटाचा सिक्वेल 'पुष्पा: द राइज'चा रिलीज झाला आहे. अल्लू अर्जुनच्या ब्लॉकबस्टर ‘पुष्पा 2: द रुल’ने रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवलेली पहायला मिळत आहे. अल्लू अर्जुनने नवा विक्रम रचला आहे. पुष्पा 2 च्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी 68 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
‘पुष्पा 2: द रुल’ने पहिल्या दिवशी चित्रपटाने 10 रेकॉर्ड केले. 2024 मधील या सर्वात धमाकेदार चित्रपटाच्या एका सीनची बरीच चर्चा आहे. लोक 6 सेकंदाचा सीन विसरू शकत नाहीत आणि याला चित्रपटाचा यूएसपी म्हटलं जात आहे. अवघ्या ६ मिनीटांच्या सीनसाठी ६० कोटी खर्च केल्याचं सांगण्यात येत आहे. हा सीन म्हणजे ‘गंगम्मा जतारा’ सीन आहे. ज्यामध्ये अल्लू अर्जुन पूर्णपणे वेगळ्या रुपात दिसत आहे.
काय आहे या सीनमध्ये?
अल्लू अर्जुनने स्त्रिया करतात तसा सोळा श्रृंगार केल्याचं पाहायला मिळत आहे. निळ्या रंगाचा पूर्ण मेकअप, पायघोळ साडी, भरपूर दागिने आणि हार, कानात झुमके आणि नाकात बाली घालून सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. या सीनला चित्रपटाचा व्हिसल सीन म्हटलं गेलं. तुम्हाला माहिती आहे का की या 6 मिनीटांच्या सीनसाठी निर्मात्यांनी 60 कोटी रुपये खर्च केले आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर सर्वत्र चर्चा आहे की अखेर ‘गंगम्मा जतारा’ काय आहे?
‘गंगम्मा जतारा’ काय आहे?
पुष्पा 2 चा ‘जतारा’ देखाव्याविषयी जाणून घेऊया. हा उत्सव ‘तिरुपती गंगाम्मा जतारा’ नावाच्या धार्मिक उत्सवाशी संबंधित आहे. तिरुपती येथील मूळ रहिवासी हा उत्सव साजरा करतात. दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो. मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात हा उत्सव साजरा केला जातो.
कोण आहे गंगाम्मा देवी?
गंगाम्मा देवी ही श्री वेंकटेश्वराची धाकटी बहीण आहे. गंगामाची येथे पूजा केली जाते. या देवीच्या उत्सवावेळी महिलांच्या सन्मानाशी संबंधित एक जुनी प्रथा आहे. जतारा दरम्यान, तिरुमला तिरुपती देवस्थानम भगवान वेंकटेश्वराकडून देवी गंगाम्मा यांना एक शुभ भेट ‘पेरीसू’ पाठवली जाते. ज्यामध्ये साडी, हळद, कुंकुम, बांगड्या यासारख्या सजावट ठेवल्या जातात. ज्याप्रकारे महाराष्ट्रात देवीला खण नारळाची ओटी भरली जाते.
तिरुपतीचे मूळ रहिवासी दरवर्षी देवी गंगामाचे आभार मानण्यासाठी उत्सव साजरा करतात, ज्याचा एक भाग म्हणून भक्त मंदिरात जातात. पुरुषांच्या साडी नेसण्याच्या विधीला पॅरेंटलु वेशम म्हणतात. जो परंपरेने कैकला कुळात केला जातो. चार दिवस चालणाऱ्या ‘गंगम्मा जतारा’ या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी, पुरुष महिलांच्या वेशभूषेत पूजा करण्यासाठी मंदिरात जातात. या प्रथेप्रमाणे पुष्पा सिनेमातील या सीनमध्ये अल्लू अर्जुन महिलांच्या वेशभूषेत पाहायला मिळाला आहे.