पुण्यात भाजपाची तब्बल 7 तास बैठक; बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांच्याशी चर्चा

पुण्यात भाजपाची तब्बल 7 तास बैठक; बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांच्याशी चर्चा

कसबा पोटनिवडणूकीने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

कसबा पोटनिवडणूकीने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कसबा आणि चिंचवड मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून रणनीती आखली जात आहे. भाजपाच्या बैठकांवर बैठका होत आहे. यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवा उद्योजक आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांच्यात बैठक झाली.

गणेश मंडळाचे आधारस्तंभ असलेल्या बालन यांच्या माध्यमातून कसब्यात महत्वाची मदत होऊ शकते या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. कसबा पोटनिवडणूकीत आता स्वतः उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जातीने लक्ष घातले आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस आमदार सिदार्थ शिरोळे यांच्या निवासस्थानी काही महत्वाच्या निवडक व्यक्तीशी भेट घेऊन चर्चा केली.

देवेंद्र फडणवीस यांनी व्यापारी वर्गातील काही दिग्गज मंडळींचीही भेट घेतली आहे. ज्यांचा पुण्यातील कसबा पेठ मतदार संघात मोठा व्यापारी वर्ग आहे. यात उद्योजक पुनीत बालन यांच्याशीही तब्बल वीस ते पंचवीस मिनिटे चर्चा केल्याचे समोर आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com