विधानभवनातील शिवसेनेच्या एकाच कार्यालयाचे बनले 2 भाग

विधानभवनातील शिवसेनेच्या एकाच कार्यालयाचे बनले 2 भाग

विधानभवनातील शिवसेनेच्या कार्यालयाची दोन भागात विभागणी करण्यात आली आहे.

विधानभवनातील शिवसेनेच्या कार्यालयाची दोन भागात विभागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे.नागपूर विधानभवनातील शिवसेनेच्या कार्यालयाची दोन भागात विभागणी. एक भाग ठाकरे गटाला तर दुसरा भाग शिंदे गटाला असे करण्यात आले आहे. त्यात आता शिवसेनेच्या २ गटांमध्ये यंदाच्या अधिवेशनात पुन्हा वाद उफाळून येणार आहे.

आता शिवसेनेच्या विधिमंडळ पक्ष कार्यालयाबाहेर २ पाट्या लावण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे कार्यालय कुणाला द्यायचे असा प्रश्न सगळ्यांना पडला होता त्यावर तोडगा म्हणून आता कार्यालयाचे २ भाग बनवण्यात आले आहे. त्यामुळे एकाच कार्यालयात शिंदे-ठाकरे गटाचे आमदार शेजारी शेजारी बसणार आहेत.

नागपूर हिवाळी अधिवेशनानिमित्त शिवसेनेचे ठाकरे-शिंदे गट दोन्ही आमनेसामने येण्याची शक्यता आहे. महागाई, बेरोजगारी आणि महापुरुषांचा अपमान यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करणार आहेत. तर सत्ताधारीही विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com