ताज्या बातम्या
गॅंगस्टर डी के रावला अटक; खंडणी प्रकरणी गुन्हे शाखेची कारवाई
खंडणी प्रकरणी गुन्हे शाखेने ही कारवाई केली असल्याची माहिती मिळत आहे.
गॅंगस्टर डी के रावला अटक करण्यात आली आहे. खंडणी प्रकरणी गुन्हे शाखेने ही कारवाई केली असल्याची माहिती मिळत आहे. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक डी के रावला अटक करण्यात आली आहे.
डी के राव यांच्यासोबत त्याच्या 6 साथीदारांनासुद्धा अटक करण्यात आली आहे. खंडणी, फसवणूक प्रकरणी डी के रावला अटक करण्यात आली आहे. आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे.