पठाण चित्रपट प्रदर्शित करु नका, अन्यथा आंदोलन करु; बजरंग दल
Admin

पठाण चित्रपट प्रदर्शित करु नका, अन्यथा आंदोलन करु; बजरंग दल

पुणे आणि नाशिकमध्ये पठाण सिनेमा हाऊसफुल्ल आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पुणे आणि नाशिकमध्ये पठाण सिनेमा हाऊसफुल्ल आहे. तसेच सांगलीतील शाहरुख खान फॅन क्लबच्या ग्रुपने अख्ख थेटर बुक केले आहे. सकाळी 8.30 वाजता सेलिब्रेशन करून थेटरमध्ये चित्रपट पाहण्यास जाणार आहेत. दुसरीकडे बजरंग दलाने पठाण चित्रपटाला विरोध दर्शवत पठाण चित्रपट प्रदर्शित करू नका, असे निवेदन दिले आहे.

बेशरम रंग गाण्यातील दीपिका पादुकोणने परिधान केलेल्या भगव्या बिकिनीवरुन सुरु झालेला वाद चांगलाच पेटला आहे. बजरंग दलाने सांगलीत हा चित्रपट प्रदर्शित करु नये असे सांगितले आहे. चित्रपटगृह चालकांना पठाण चित्रपट प्रदर्शित न करण्याची विनंती केली. पठाण चित्रपट प्रदर्शित केल्यास आंदोलन करु, असा इशाराही बजरंग दलाने दिला आहे.

हा चित्रपट भारताव्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण झाले आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषेंमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शन केलं आहे. शाहरुखसोबतच पठाण चित्रपटात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

पठाण चित्रपट प्रदर्शित करु नका, अन्यथा आंदोलन करु; बजरंग दल
आज शाहरुख खानचा पठाण चित्रपट रिलीज होणार
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com