LOKशाही संवाद : दोन शिवसेना खरंच अस्तिवात आहेत का? राहुल नार्वेकर यांनी स्पष्टच सांगितले
Admin

LOKशाही संवाद : दोन शिवसेना खरंच अस्तिवात आहेत का? राहुल नार्वेकर यांनी स्पष्टच सांगितले

लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज गुरुवारी लोकशाही संवाद कार्यक्रम मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडला.

यावेळी राहुल नार्वेकर यांना प्रश्न विचारण्यात आला की, दोन शिवसेना खरंच अस्तिवात आहेत का? एकमेकांवर आरोप केले जातात की आम्हीच खरी शिवसेना. विधिमंडळातील परिस्थिती काय आहे की खरंच दोन शिवसेना तिथे अस्थितवात आहेत की नाही?

यावर उत्तर देत राहुल नार्वेकर म्हणाले की, माझ्यासमोर आज रेकॉर्डवरती एकच शिवसेना गट आहे. जोपर्यंत माझ्याकडे मागणी येत नाही तोपर्यंत माझ्याकडे एकच शिवसेना गट आहे. शिवसेना विधिमंडळ त्यावेळेला 56 आमदार निवडून आले होते. त्यांच्या कोणत्याही गटाने विधानसभा अध्यक्षांकडे मागणी केली नाही आहे की वेगळा गट म्हणून केला जावा. त्यामुळे माझ्यासमोर एकच गट आहे. त्याचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्य प्रतोद भरत गोगावले आहेत. त्यामुळे जोपर्यंत माझ्याकडे अशी मागणी होत नाही की आम्हाला वेगळा गट म्हणून समजण्यात यावं तोपर्यंत माझ्यासमोर एकच शिवसेना गट आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com