३५ दिवस लागतात का समस्या सोडवण्यासाठी? संतप्त नागरिकांचा पालिकेला सवाल
Team Lokshahi

३५ दिवस लागतात का समस्या सोडवण्यासाठी? संतप्त नागरिकांचा पालिकेला सवाल

खडकपाडा चौकातील चेंबर्सची दुरावस्था ,वाहनचालक नागरिकांना मनस्ताप

अमजद खान |कल्याण : कल्याण खडकपाडा चौकात असलेल्या चेंबर्सची दुरावस्था झाली आहे. या चेंबर्सची झाकणं तुटलेले असल्याने अनेकदा वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. अनेकदा या चेंबर्सचा अंदाज नआल्याने या ठिकाणी अपघातही घडलेले आहेत. याबाबत महिना भरापासून खडकपाडा चौकात असलेले हे चेंबर्स दुरुस्त करण्यासाठी खडकपाडा व्यापारी रहिवासी संघटनेतर्फे पाठपुरावा सुरू आहे.

मात्र 35 दिवस उलटूनही अद्याप या चेंबर्सची डागडुजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे आज संतप्त नागरिक व्यापारी, रीक्षाचालकांनी हातात निषेधाचे फलक घेऊन महापालिकेच्या कारभाराचा निषेध नोंदवला. यावेळी हे चेंबर तत्काळ दुरुस्त करावे तसेच हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असे मागणी उमेश बोरगावकर यांच्यातर्फे करण्यात आली.

Lokshahi
www.lokshahi.com