गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून दोघांवर प्राणघातक हल्ला

गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून दोघांवर प्राणघातक हल्ला

गाडीला धक्का लागला म्हणून टेम्पोचालक आणि त्याच्या साथीदारवर कारचालक आणि त्याच्या साथीदारांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली सोनारपाडा येथे घडली.

अमजद खान, डोंबिवली

गाडीला धक्का लागला म्हणून टेम्पोचालक आणि त्याच्या साथीदारवर कारचालक आणि त्याच्या साथीदारांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली सोनारपाडा येथे घडली. जखमी टेम्पो चालक आणि वाद सोडवायला गेलेले तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मानपाडा पोलिसांनी हल्ला करणाऱ्या पंडित म्हात्रे आणि त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

डोंबिवली पूर्वेकडील सोनरपाडा परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे .रात्री मंडप डेकोरेट चे सामान घेवून टेम्पो चालक हर्षद रसाळ मानपाडा रोड ने जात असताना समोरून येणाऱ्या एका कारला टेम्पोचा धक्का लागला. याच कारणावरून संतापलेल्या कार चालक पंडित म्हात्रे याने हर्षद रसाळ सोबत वाद घातला. हा वाद बघून हर्षद चा मित्र विशाल मिश्रा मध्यस्थी करण्यास गेला. पंडित म्हात्रेला याचा राग आला त्याने फोन करून काही लोकांना बोलावून घेतले.

पंडित म्हात्रे याच्या तीन साथीदारानी हर्षद व विशाल यांना मारहाण केली इतकेच नव्हे तर धारदार शस्त्राने दोघांना जखमी केले. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात हल्ला करणाऱ्या पंडित मात्र त्याच्या साथीदार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले विशाल व हर्षद यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Lokshahi
www.lokshahi.com