महाराष्ट्राच्या राजकारणात घराणेशाहीचे वर्चस्व, पक्षनिहाय आकडेवारी समोर
राज्यातील राजकारणात घराणेशाहीचे वर्चस्व असल्याचा आरोप कायमच होत आला आहे. ही विधानसभा निवडणुकही त्याला अपवाद नाही राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल २३७ मतदारसंघांतील उमेदवार कोणत्या ना कोणत्या तरी घराण्याचे वारस असल्याच समोर आलं. सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी यांसंदर्भात मुद्दा उपस्थित आकडेवारी मांडली आहे.
पक्षानुसार घराणेशाहीची आकडेवारी
भाजपने १४९ जागा लढवल्या, त्यातील ४९ उमेदवार वारसाहक्काने आले.
काँग्रेसने १०१ जागा लढवल्या, त्यातील ४२ उमेदवार वारसाहक्काने आले.
शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ८६ जागा लढवल्या, त्यातील ३९ उमेदवार वारसाहक्काने
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसनं ५९ जागा लढल्या त्यापैकी २६ उमेदवार हे घराणेशाहीतील होते
महायुतीचे एकूण ९४ उमेदवार घराणेशाहीतील
तर मविआचे १०० उमेदवार घराणेशाहीतले
अपक्ष निवडणूक लढणाऱ्यांमध्येही ४३ उमेदवार वेगवेगळ्या राजकीय घराण्यांमधलेच होते.
दरम्यान आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात होताच एकाच कुटुंबातील अनेक पिढ्या, अनेक भावंडं यानिमित्तानं विधानसभेत पाहायला मिळाली.
विधानसभेतली कुटुंबसभा
१- दानवे कुटूंब
माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या दोन्ही मुलांनी विधानसभेला विजय मिळवला. त्यांच्या कन्या संजना जाधव शिंदेंच्या शिवसेनेकडून कन्नड विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. तर भोकरदन विधानसभा मतदारसंघातून त्यांचे पुत्र संतोष दानवे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यामुळे एकाच घरात दोन आमदारकीची पदं घेऊन आलेले दानवे बंधूभगिणी विधानसभेत
२- सामंत बंधू
उदय सामंत हे विधानसभेला रत्नागिरी मतदार संघातून पुन्हा एकदा निवडून आले आहेत. शिवाय, त्यांचे सख्खे बंधू किरण सामंत हेदेखील विधानसभेला राजापूर मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यामुळे या सामंत बंधूंची जोडी विधानसभेत आता एकत्र पाहायला मिळणार आहे.
३- राणे बंधू
कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे विजयी झाले. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून निलेश राणे हे विजयी झाले. त्यामुळे दोन भाऊ विधानसभेत आहेत.
४- मावसभावांची जोडी
वरळी विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे आमदार झाले. तर त्यांचेच सख्खे मावस भाऊ वरुण सरदेसाई हे वांद्रे पूर्व मतदार संघातून निवडून आले. त्यामुळं या मावसभावांची जोडी विधानसभेत एकत्र पाहायला मिळणार आहे.
५-एकाच घरातील दोन जावई विधानसभेत
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील इस्लामपूर वाळवा मतदारसंघातून विधानसभेला निवडून आले. तर त्यांचे सख्खे साडू भाजपचे सत्यजीत देशमुख हे शिराळा मतदारसंघातून निवडून आले. जयंत पाटील यांच्या पत्नी शैलजा आणि सत्यजीत यांच्या पत्नी रेणुका सख्ख्या बहिणी आहेत. त्यामुळं आता एकाच घरातील दोन जावई विधानसभेत पाहायला मिळणार आहेत.
६- कर्डिले-जगताप
भाजपचे शिवाजीराव कार्डिले राहुरी मतदार संघातून निवडून आले आहेत. तर दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले त्यांचे जावई संग्राम जगताप हे अहमदनगर शहरामधून विधानसभेला निवडून आले.
७- मुंडे भाऊ- बहिण
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदार संघातून विजयी झाले आहेत. तर भाजपच्या आमदार पंकजा मुंडे परिषदेच्या आमदार आहेत. त्यामुळे मुंडे भावंडं विधानसभेत आहेत.
८- पिता - पुत्र विधानसभेत
दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आमदार छगन भुजबळ हे येवला विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यांचे चिरंजीव पंकज भुजबळ हे देखील विधान परिषदेवर आमदार आहेत.
गेल्या काही वर्षांत देशातलं, तसंच राज्यातलं राजकारण बऱ्याच अर्थानं बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. यामध्ये घराणेशाहीचं चित्र आधीपेक्षा अधिकच गडद झाल्याचं या नमित्तानं स्पष्ट होताना दिसतं आहे.
सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा-